शहरातील वेशया व्यवसायावर उच्च न्यायालयाचा निर्णयानुसार अमलबाजी करण्यात यावी मागणी.

अमळनेर : शहरातील वेश्याव्यवसायवर पोलीस , नगरपालिका आणि दंडाधिकारिनी पेट्रोलिंग , पिटा कायद्याप्रमाणे व आवश्यक कारवाई करावी असे आदेश औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विभा कांकणवाडी व न्या एस जी चपळगावकर यांनी दिले आहेत.
अमळनेर येथील कुदरत अली मोहम्मद अली , शेख रियाजोद्दीन , शेरखान मोहम्मदखान यांनी २०१९ मध्ये उच्च न्यायालयात वेश्याव्यवसायाविरोधात याचिका दाखल केली होती. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी कुदरतअली यांनी पोलीस महासंचालक , जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक , उपविभागीय अधिकारी , डीवायएसपी , तहसीलदार ,पोलीस निरीक्षक मुख्याधिकारी , महिला बाल कल्याण विभागाचे नोडल अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गांधलीपुरा भागात अजंता टॉकीज जवळ वेश्याव्यवसाय खुले आम सुरू आहे. तरुण तिकडे आकर्षित होऊन वाम मार्गाला लागत आहेत. परिसरात राहणाऱ्या कुटुंबांवर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे कारवाईत सातत्य ठेवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
