इच्छुकांची जंत्री, कोण होणार मंत्री !

24 प्राईम न्यूज 15 Dec 2024. -महत्त्वाची खाती आणि मंत्रिमंडळातील संभाव्य वादग्रस्त नावांवरून लांबलेला महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज रविवारी संत्रानगरी म्हणजेच नागपूरमध्ये होत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी उरकून सरकारच्या चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. नागपुरातील राजभवनात दुपारी ४ वाजता शपथविधी सोहळा होणार असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनही उपस्थित असणार आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर रविवारी रात्री उशिरापर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) काही जुन्या माजी मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवतानाच नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. या मंत्रिमंडळात भाजपचे २१, शिवसेनेचे १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजप रवींद्र चव्हाण, नितेश राणे, मंगल प्रभात लोढा, अॅड. आशिष शेलार, अतुल भातखळकर, शिवेंद्रराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे-पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, संजय कुटे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे.
● शिवसेना उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, भरत गोगावले, गुलाबराव पाटील, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील-यड्रावकर.
०राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळ, आदिती तटकरे, अनिल पाटील, संजय बनसोडे, मकरंद पाटील, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, सना मलिक, इंद्रनील नाईक.
