उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशा नंतर ही अमळनेर शहरात खुलेआम सुरूच आहे वेश्या व्यवसाय. -कार्यवाही न केल्यास 26 जाणेवारी पासून उपोषण. -गांधलीपुरा भागातील नागरिकांनी दिले निवेदन.

आबिद शेख/ अमळनेर. -अमळनेर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे मागील भागात वेश्याव्यवसाय बाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती सदरील याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर नुकतेच उच्च न्यायालयाने आदेश दिले सदरील आदेश ची प्रती अमळनेर पोलिस स्टेशन व उच्च स्तरीय अधिकारी यांना देण्यात आली आहे परंतु सदरील कुंटणखाने वेश्याव्यवसाय खुलेपणाने सुरू आहेत कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.सदरील गैर कानूनी कुंटणखाने वेश्याव्यवसाय करणारेवर १५ दिवसात कोणतेही प्रकारे कारवाई दिवसून आली नाही. सदर कुंटणखः यामुळे आमच्या आजुबाजुच्या रहिवाशी परिसरातील महिलां व कॉलेज च्याविद्यार्थीनींना रस्त्याने चालने देखील मुक्शील झाले आहे. सदर प्रकारामुळे चांगल्या घरातील महिलांना देखील तेथील लोक त्या नजरेने बघतात, छेडछाड करतात तरी आपण सदर प्रकारावर तात्काळ कारवाई न केल्यास आम्हांस दि.२६ जानेवारी २०२५ रोजी नाईलाजास्त्व आपलया कार्यालयातील पटांगणात संविधानिक पध्दतीने उपोषणास बसावे लागेल व होणाऱ्या परिणामास आपले कार्यालय सर्वस्वी जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती तहसीलदाराना निवेदन देण्यात आले या वेळी गांधली पुरा, दर्गा आली भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते
