सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर, दि.१९ डिसेंबर१९ डिसेंबर रोजी सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाला आज उत्साहात सुरुवात झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक श्री. विकास देवरे सर, तसेच संस्थेचे चेअरमन श्री. सुरेंद्रकुमार बोहरा सर, बोहरा स्कूलचे प्राचार्य श्री. जितेंद्र सिंह सर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी परेड करुन व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत केले.श्री विकास देवरे सरांच्या हस्ते ध्वजारोहण करून, क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाली.विद्यार्थिनी झुम्बा डान्स ने क्रीडा महोत्सवाची सुरुवात कली.
त्यानंतर चेअरमन सरांनी नाणेफेक करून खो-खो खेळाला सुरुवात केली. विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला.
क्रीडा महोत्सवासाठी प्राचार्य जितेंद्र सिंह सरांचे, क्रीडाशिक्षक अमोल सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
