“श्यामची आई” या पुस्तकातील अनेक प्रसंग आपल्या बहारदार अभिनयातून एकपात्री नाट्यछटांमधून विद्यार्थ्यांच्या समोर दाखवीत अभिनेते मधुकर उमरीकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हात घातला…

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर येथील साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय यांच्या सौजन्याने साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने सुप्रसिद्ध “श्यामची आई” चे एकपात्री नाट्य रूपातील सादरीकरण अभिनेते, लेखक मधुकर उमरीकर यांनी भगिनी मंडळ प्राथमिक शाळा व सरस्वती विद्या मंदिर अमळनेर येथील विद्यार्थ्यांच्या समोर करीत साने गुरुजींच्या आठवणींना उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांमध्ये उजाळा दिला.
“श्यामची आई” या पुस्तकातील अनेक प्रसंग आपल्या बहारदार अभिनयातून एकपात्री नाट्यछटांमधून विद्यार्थ्यांच्या समोर उलगडून दाखवीत अभिनेते मधुकर उमरीकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हात घातला.
भगिनी मंडळ प्राथमिक शाळेत दिप प्रज्वलन करून एकपात्री प्रयोगाची सुरुवात करण्यात आली. अभिनेते मधुकर उमरीकर यांचा परिचय साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ यांनी करून दिला प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी केले.याप्रसंगी मंचावर संस्थेच्या सौ सरोज भांडारकर, सौ रजनीताई केले, सौ अनुरुपा भांडारकर,सौ मोहिनी खाडीलकर,सौ मंगला सोनवणे, अमळनेर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे , शिक्षण विस्ताराधिकारी सय्यद सादिक, ग्राम विस्तार अधिकारी दिपक घुगरे आदीं मान्यवर उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ.विजया गायकवाड यांनी केले.याप्रसंगी ॲड रामकृष्ण उपासनी,निलेश पाटील, दिपक वाल्हे,सुमित कुलकर्णी आदीसह रमेश सोनार सहा.ग्रंथपाल मधुकर बाळापुरे आदींनी परिश्रम घेतले.
सरस्वती विद्या मंदिर, अमळनेर
सरस्वती विद्या मंदिर येथे श्यामची आई या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत मधुकर उमरीकर यांनी साने गुरुजींच्या बालपणातील श्यामच्या जीवनातील प्रसंगाचे एकपात्री सादरीकरण आपल्या भाषणातून करीत उपस्थित विद्यार्थ्यांना साने गुरुजींचा जीवन परिचय यावेळी करून दिला . कार्यक्रमाच्या सुरवातीस साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. सरस्वती विद्या मंदिर च्या वतीने मधुकर उमरीकर यांचा पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास साने गुरुजी ग्रंथालय वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ संचालक निलेश पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी सय्यद सादिक, ग्राम विस्तार अधिकारी दिपक घुगरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरस्वती विद्या मंदिर चे शिक्षक आनंदा पाटील, संगीता पाटील गीतांजली पाटील, ऋषिकेश महापूरकर शितल पाटील ,व पूनम पाटील, हेमंत बडगुजर, किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!