दोडाईचा पोलिसांची दमदार कामगिरीजबरी चोरीचा गुन्हा घडल्याचे २४ तासात गुन्हा उघडकीस आणले

0

दोंडाईचा प्रतिनिधी/ रईस शेख

दोंडाईचा पोलीस ठाणे येथे दिनांक २६/१२/२०२४ रोजी मंदीर बांधकाम मिस्तरी श्री. दिगंबर शिवाजी पवार वय-३४ रा. रिसनगाव, ता. लोहा, जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादमध्ये ते त्यांचे सोबतचे गंगाधर रंगनाथ पऊळ यांचेसह मंदीर बांधकामाची अक्कलकोस ता. शिंदखेडा येथुन मिळालेली रोख अडीच लाख रुपयाची रक्कम घेवुन त्यांचे कडील मोटार सायकल क्रमांक. MH-२६-CF-६९९५ हिच्याने अक्कलकोसकडून मालपुर मार्ग येांना हॉटेल हिरण्या येथे जेवण करुन मालपुर चौफुली कडुन धुळे चौफुलीकडेस जात असतांना रात्री ०८.३० वाजेचे सुमारास दोन मोटार सायकलवर डबलसीट प्रमाणे बसून आलेले चार तरुण ईसमांनी त्यांच्या मोटार सायकली आडव्या लावून फिर्यादी दिगंबर पवार यांची मोटार सायकल थांबवून त्यांना व सोबतचे गंगाधर पऊळ अशांना चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याच्या धमक्या देवुन शिवीगाळ दमदाटी करीत मारहाण करुन फिर्यादी यांचे खिशातील मोबाईल फोन व मोबाईल पॉवर बैंक असे जबरीने काढून घेतले तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना झटका देवुन स्वताची सुटका करुन घेवून रस्त्याचे बाजुस अंधा-यातुन पळून गेल्याने त्यांचेकडील रोख अडीच लाख रुपयाची रक्कम वाचली त्यानंतर सदर चारही चोरटयांनी फिर्यादी यांचे सोबतचे गंगाधर पऊळ यांना मारहाण करुन जमीनीवर ढकलून देवून त्यांचे कडील मोटार सायकल क्रमांक- MH-२६-CF-६९९५ हि जबरीने हिसकावून घेवून पळून गेले होते. अशी फिर्याद दिनांक २७/१२/२०२४ रोजी दोंडाईचा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली. सदर दाखल गुन्हया संदर्भात मा.श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधिक्षक धुळे, श्री. किशोर काळे, अप्पर पोलीस अधिक्षक धुळे, श्री. सुनिल गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या माहिती वरुन त्यांनी गुन्हयाचे गांभीय ओळखून तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून त्यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे सपोनि दिगंबर शिंपी, पोहेको ९८८ रविंद्र गिरासे, पोकी/४५६ हिरालाल सुर्यवंशी, पोकों/१६३८ महेश शिंदे, पोकॉ/१७१४ प्रविण निकुंभे, पोकी/१४७ तुषार पवार, पोकी ४०१ सौरभ बागुल, होमगार्ड/अमीन शहा अशांनी गुन्हयात आरोपी (१) शुभम ऊर्फ बंन्टी अनिल भोई (रामोळे) वय- १९ वर्ष (२) राकेश संजय कोळी वय-२६ वर्ष, दोन्ही रा. डाबरी घरकुल, दोंडाईचा अशांना गुन्हयातील फिर्यादी यांची जबरीने चोरी करुन घेवून गेलेली मोटार सायकल क्रमांक. MH-२६-CF-६९९५ हिचेसह संगेहात पकडून सदर दोन्ही आरोपीतांना गुन्हयात अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील गेला मालातील सदर मोटारसायकलसह फिर्यादी यांचा मोबाईल फोन व मोबाईल पॉवर बैंक असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर आरोतांकडुन त्यांचे गुन्हयातील दोन साथीदार यांची नावे निष्पन्न करुन त्यांचेकडून अशाचप्रकारचे त्यांनी केलेले आणखी इतर गुन्हे उघडकीस येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!