लाखो बँक अकाऊंट होणार बंद. -बँकांच्या नियमांमध्ये बदल निष्क्रिय खात्यांविरोधात मोहीम

24 प्राईम न्यूज 31 Dec 2024. -नवीन वर्षात बँकांच्या नियमांमध्ये अनेक बदल होणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून अर्थात १ जानेवारी २०२५ पासून ३ प्रकारची बँक खाती बंद करण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. नव्या नियमांनुसार डोरमेंट अकाऊंट, निष्क्रिय बँक खाते आणि झिरो बॅलन्स खात्यात कुठल्याही प्रकारचे व्यवहार होत नसतील, तर अशी लाखो खाती बंद करण्यात येतील. –ग्राहकांनी काय काळजी घ्यावी ?
या तीन प्रकारांमध्ये बँक खाते असेल तर ग्राहकांनी काळजी घेण्याची गरज आहे. व्यवहार होत नसलेल्या तसेच झिरो बॅलन्स खात्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ग्राहक आणि बँकांची फसवणूक होते. ही फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी, डिजिटल व्यवहारवाढवण्यासाठी तसेच केवायसी मजबूत होण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँक खाते २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून बंद असेल तर तातडीने केवायसी करून घेण्याची गरज आहे.
बँक खात्यात रक्कम शिल्लक असणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. खातेधारकांना आपल्या बँक खात्याबद्दल काही शंका असल्यास त्यांनी बँकेच्या शाखेला भेट देण्याची सूचना करण्यात आली आहे.