अमळनेरात एकाचा मोबाईल हॅक करुन एक लाखात गंडविले..

आबिद शेख/अमळनेर : शहरातील एकाचा मोबाईल हॅक करून एकाने १ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली आहे. फिर्यादी भावेश गणेश पाठक रा. बाहेरपुरा यांचे बँकेत युनियन बँकेच्या अकाउंट मधून दि. ७ रोजी दुपारी ४ ते ७ वाजेच्या सुमारास मोबाईल हॅक झाल्याने दुसरा अज्ञात एक हॅक करून मोबाईल मधील डेटावर लक्ष ठेऊन होताव डेटा वापरत होता.
त्याने अशा फसवणूक करत एक लाख रुपये एका नंबर वर ट्रान्सफर झाले. त्यानंतर दचकलेल्या पाठक बँकेत जाऊन त्यांनी बँकेला सूचना देत मोबाईल हॅक झाल्याची माहिती दिली व अमळनेर पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. त्यावरून अमळनेर पोलिसात सायबर अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.