लोढवे विद्यालयात बोर्ड परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा…

आबिद शेख/अमळनेर
लोढवे येथील स्व. आबासो. एस्. एस्. पाटील माध्य. विद्यालयात २१ जानेवारी २०२३ रोजी इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षा संदर्भात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक श्री. दिलीप बळीराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा म्हणजे काय आणि योग्य अभ्यास कसा करावा, याबाबत माहिती देण्यात आली. २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२३ या कालावधीत इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षा होणार असल्याने, विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी विविध सराव व पूर्व परीक्षा घेतल्या जात आहेत.
कार्यक्रमाचे संचालन श्री. दीपक मुरलीधर पवार यांनी केले, तर मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब जिवन पाटील यांनी मार्गदर्शक श्री. पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केला. या प्रसंगी अन्य शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन प्राप्त करून परीक्षा संबंधी भितीवर विजय मिळवण्यासाठी प्रेरणा घेतली, हे विशेष महत्त्वाचे आहे.