अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षण सोडत दिनांक 30 जानेवारी रोजी…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता नगरपरिषद कार्यालय, अमळनेर येथील बैठक सभागृहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या साशा/ग्रामप/कावि/2025 क्रमांकाच्या दिनांक 24 जानेवारी 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार ही कार्यवाही होणार आहे.
या सोडतीदरम्यान अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांसाठी सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, महिलांसाठीही आरक्षण राखून ठेवले जाणार आहे. यामध्ये हिंगोणे बु., दहिवद, दहिवद खु., कुन्हे खु., मालपूर, खडके, लोणसिम, लोण बु., तळवाडे, निसर्डी, धार, रणाईचे बु. आणि रणाईचे खु. या 13 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्व संबंधित नागरिक, राजकीय पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी या सोडतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार रुपेश खुराणा वतीने करण्यात आले आहे.