चिमनपुरी पिंपळे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन..

आबिद शेख/ अमळनेर
चिमनपुरी पिंपळे येथील जि. प. प्राथमिक केंद्रीय शाळा आणि कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ध्वजारोहणाचा मान सीमा सुरक्षा बलाचे मंगेश बाबूलाल पाटील आणि मुख्याध्यापक राजू भावराव पाटील यांना मिळाला.
ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे खु येथे उपसरपंच शोभाबाई गोकुळ पाटील यांच्या हस्ते, तर ग्रामपंचायत पिंपळे बुद्रुक येथे सौ. दगुबाई भीमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सेवानिवृत्त मंडळ अधिकारी डी. आर. पाटील आणि ग्रामपंचायतच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिस्किट पुळे वाटप करण्यात आले.
यावेळी जि. प. शाळेच्या मुख्याध्यापक राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विद्यार्थ्यांनी संविधान वाचन सादर केले. कार्यक्रमात उपशिक्षक सुनील दौलत वाघ, इसाक मगण मावची, शिक्षिका मीना अभिमान सोनवणे, वंदना भालचंद्र पाटील, दर्शना देवीदास पाटील आणि कै. सुकलाल आनंद पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भोसले तसेच ज्येष्ठ शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायतचे माजी सरपंच योगेश अशोक पाटील, उपसरपंच शोभाबाई गोकुळ पाटील, सदस्य अरुण संभाजी पाटील, संतोष बापू चौधरी, कल्पना साहेबराव पाटील यांच्यासह महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.