लाडक्या बहीणींसाठी दिलासा – योजनेचा हप्ता सुरू!

24 प्राईम न्यूज 26 Jan 2025
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता शुक्रवारी संध्याकाळपासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील लाखो महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत असून, २६ जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळून जातील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली असून, आतापर्यंत अडीच कोटी महिलांना तिचा लाभ झाला आहे. निवडणुकीपूर्वी सरकारने दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, त्याबाबतच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.
महिलांसाठी सुरू असलेल्या या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ती महत्त्वाची ठरली आहे.