बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल शाळेचा क्रीडा मेळावा उत्साहात संपन्न..

एरंडोल (प्रतिनिधि ) येथील बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल चा प्रथम क्रीडा मेळावा २०२३ मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार चिमणरावजी पाटील , जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील , संस्था अध्यक्ष प्रमोद पाटील, प्राचार्या सुरेखा पाटील. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनीत चव्हाण प्राचार्य गव्हर्मेंट आयटीआय, प्रा. नितीन पाटील, नानाभाऊ साळुंखे, पंचक्रोशीतील २० गावांचे सरपंच या प्रमुख उपस्थितांनी दीप प्रज्वलन, खेळध्वजारोहण केले. क्रीडा मेळाव्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते
बक्षीस वितरण करण्यात आले.
आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या मनोगतात जीवनात खेळण्याचे महत्त्व विशद केले. संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी राष्ट्रीय स्तरावरील इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम राबवून केवळ शिक्षणच नव्हे तर भारतीय संस्कृती व मानवीय जीवनमूल्य शिकविणारी ख-या अर्थाने शाळेत राबविले जाईल असे उपस्थित पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शनास सांगितले. जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शालेय जीवनात सर्वच विषयांना प्राधान्यक्रम द्यावा. सदर क्रीडा मेळाव्यात जितेंद्र पाटील यांचे मार्गदर्शन लाभले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विद्यार्थिनींनी केले. आभार प्रदर्शन मीनल पाटील. कार्यक्रमाची संकल्पना अध्यक्ष प्रमोद पाटील व प्रा. सुरेखा पाटील, यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.