जि. प. प्राथमिक शाळा रणाईचे येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…

आबिद शेख/अमळनेर. – रणाईचे (30 जानेवारी 2025): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणाईचे येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जानवे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. शरद जानकीराम सोनवणे आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष धरमदास राठोड यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, कालीबिंदी, मेरा रंग दे बसंती चोला, वेंगळ लागे मजेदार, जातेन आतेम बंजारा गीत, कोळीगीत, शिवकन्या यांसारख्या गाण्यांवर बहारदार नृत्य सादर केले. तसेच सासू-सुनेचे नाटक देखील विशेष आकर्षण ठरले.
रणाईचे बुद्रुक व रणाईचे खुर्द गावातील रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सतीश ढोले, शिक्षक शत्रुघ्न रोकडे, वैशाली पाटील, प्रतिभा पाटील आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन महेंद्र पाटील सर यांनी केले.