जी.एस. हायस्कूलमध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न…

आबिद शेख/अमळनेर… खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूल येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे चेअरमन आण्णासाहेब हरी भिका वाणी होते.
यावेळी हिवाळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देण्यात आले. उत्तरपत्रिका लेखन तंत्रासह सर्व विषयांवरील उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना पुरविण्यात आली.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मुख्याध्यापक बी.एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए.डी. भदाणे, पर्यवेक्षक एस.आर. शिंगाने, सी.एस. सोनजे, शिक्षक प्रतिनिधी एस.पी. वाघ, तसेच मुख्य लिपिक शाम पवार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, शिक्षक व मित्रांसोबतचे अनुभव व्यक्त केले. सूत्रसंचालन आर.जे. पाटील यांनी केले, तर आभार एन.जे. पाटील यांनी मानले.