पत्रकार प्रीमियर लीग: जळगावमध्ये तीन दिवस क्रिकेटचा जल्लोष..

आबिद शेख/अमळनेर
पत्रकारांसाठी जिल्ह्यात प्रथमच आयोजित पत्रकार प्रीमियर लीग (PPL) उद्या, सोमवार दि. १० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे होणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील २० पत्रकार संघ सहभागी होणार असून, सामने नॉकआउट पद्धतीने खेळवले जातील.
स्पर्धेचा थरार तीन दिवस रंगणार असून पहिल्याच दिवशी ९ सामने खेळले जातील. आयोजकांनी लॉट्स जाहीर केले असून, सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुपस्थित संघ बाद ठरणार आहेत, अशी स्पष्ट सूचना आयोजकांनी दिली आहे.
सामन्यांचे वेळापत्रक:
पहिला दिवस – १० फेब्रुवारी २०२५
▶ सकाळी ८.००: प्रिंट मीडिया (टीम १) vs डिजिटल मीडिया
▶ सकाळी ९.३०: यूट्यूब मीडिया vs प्रेस फोटोग्राफर
▶ सकाळी ११.००: चाळीसगाव vs रावेर
▶ सकाळी १२.३०: मुक्ताईनगर vs भडगाव
▶ दुपारी २.००: यावल vs पाचोरा
▶ दुपारी ३.३०: धरणगाव vs भुसावळ
▶ सायंकाळी ५.००: अमळनेर vs चोपडा
▶ सायंकाळी ६.३०: संपादक vs जामनेर
दुसरा दिवस – ११ फेब्रुवारी २०२५
▶ सकाळी ८.००: इलेक्ट्रॉनिक्स मीडिया vs प्रिंट मीडिया (टीम २)
क्वार्टर फायनल सामने:
▶ सकाळी ११.००: एम १ vs एम ३
▶ सकाळी १२.३०: एम २ vs एम ४
▶ दुपारी २.००: एम ५ vs एम ८
▶ दुपारी ३.३०: एम ६ vs एम ९
▶ सायंकाळी ५.००: एम ७ vs एम १०
तिसरा दिवस – १२ फेब्रुवारी २०२५
▶ सेमी फायनल आणि ग्रँड फायनल
▶ सायंकाळी ६.००: समारोप आणि बक्षीस वितरण
आयोजक समिती:
वाल्मिक जोशी, चेतन वाणी, वसीम खान, किशोर पाटील, जकी अहमद, सचिन गोसावी.
पत्रकारांच्या उत्साहाला वेग मिळावा आणि मैत्रीपूर्ण स्पर्धा व्हावी, यासाठी या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींना या रोमांचक सामन्यांचा आनंद घेता येणार आहे!