अमळनेर नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक संदानशिव यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक सोमचंद छगन संदानशिव हे नियत वयोमानानुसार 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ इंदिरा भुवन येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात नगरपरिषद कार्यालयातून वाजतगाजत मिरवणुकीने झाली. कामगार वर्गाने त्यांना सपत्नी इंदिरा भुवन येथे नेले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील होते.

30 वर्ष 4 महिन्यांची उल्लेखनीय सेवा

सोमचंद संदानशिव यांनी नगरपालिका कर्मचारी संघटना अध्यक्ष, सानेगुरुजी न. प. कर्मचारी पतपेढी चेअरमन यासह विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. नुकतीच त्यांची नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्षपदी निवड झाली आहे, त्यामुळे ते एक सक्षम कामगार नेते म्हणून ओळखले जातात. कार्यक्रमाला मुख्याधिकारी तुषार नेरकर, जळगाव जनता बँकेचे शाखाधिकारी महेश गर्गे, महावीर पतपेढीचे चेअरमन प्रकाशचंद्र पारेख, माजी नगरसेवक मनोज पाटील, नरेंद्र संदानशिव, प्रा. अशोक पवार, प्रविण पाठक, सुनिल भामरे, विक्रांत पाटील, प्रा. डॉ. विजय तुंटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले. प्रारंभी चेतन राजपूत यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. यावेळी आमदार अनिल पाटील, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रा. अशोक पवार, प्रविण पाठक आणि प्रा. तुंटे यांनी संदानशिव यांच्या कार्याचा गौरव केला.

कुटुंबीयांचा भावनिक क्षण

संदानशिव यांच्या मुलींनीही आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना संदानशिव यांनी सर्वांचे ऋण व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, माझं गाव माझं अमळनेर ग्रुप, न. प. कर्मचारी संघटना यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!