अमळनेरमध्ये १० वी व १२ वी परीक्षांसाठी कॉपीमुक्त वातावरणाची मागणी..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – येथील खाजगी कोचिंग क्लासेस संघटना (PTA) तर्फे १० वी आणि १२ वी बोर्ड परीक्षा संपूर्णपणे कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी आज (१० फेब्रुवारी) शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन गट शिक्षणाधिकारी तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, अमळनेर यांना सादर करण्यात आले. यावेळी PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, शेखर कुळकर्णी, स्वर्णदीप राजपूत, सुनिल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात मागील परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॉपी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण..