अमळनेर मध्ये मोटरसायकल चोरीप्रकरणी आरोपी जेरबंद, दोन वाहने जप्त..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील पिंपळे रोड येथील ग.स. सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीस गेलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्रमांक MH 19 DH 2311) अखेर पोलिसांनी हस्तगत केली आहे.
दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी अजिंक्य किरण पाटील (वय 27, रा. लक्ष्मी नगर, अमळनेर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मोटरसायकल 5 फेब्रुवारीच्या दुपारी 1.45 ते 3.30 वाजेदरम्यान चोरीस गेली होती.
माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री विकास देवरे यांच्या आदेशाने विशेष पथक तैनात करण्यात आले.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने नंदुरबार शहरात संशयित धनंजय उर्फ भूषण काशिनाथ कुवर (वय 31, रा. तलवाडे, ता. जि. नंदुरबार) यास शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरी गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यात आली.
पुढील तपासात आरोपीने दोंडाईचा रेल्वे स्टेशन येथून होंडा सीबी शाईन मोटरसायकल चोरी केल्याचे देखील उघडकीस आले. पोलिसांनी ती देखील आरोपीच्या ताब्यातून जप्त केली असून, संबंधित वाहनमालकाचा शोध सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे, प्रशांत पाटील, उज्वल मस्के, विनोद संदानशिव, अमोल पाटील, जितेंद्र निकुंबे आणि गणेश पाटील यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्ट