उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाचा समारोप; डायट प्राचार्य अनिल झोपे यांचा सत्कार…

आबिद शेख/अमळनेर
जळगाव – आज दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या निरोप समारंभात डायट प्राचार्य माननीय अनिल झोपे साहेब यांचा सत्कार अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मोहसिन खान यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाला डायटचे अधिव्याख्याता मा. साळुंखे साहेब, जळगाव मनपा प्रशासन अधिकारी खालील शेख साहेब, बीएड कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. इरफान शेख, केंद्रप्रमुख मसूद सर आणि डीएड कॉलेजच्या प्रिन्सिपल सईदा मॅडम उपस्थित होते.
उर्दू शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यात वृद्धी करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग झाला. उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले व त्यांच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.