आगग्रस्त कुटुंबाला मणियार बिरादरीचा मदतीचा हात…

आबिद शेख/अमळनेर
जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको येथे लागलेल्या भीषण आगीत एका घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची बातमी प्रकाशित होताच, जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरीने तत्काळ मदतीचा हात पुढे केला.
संस्थेच्या वतीने पीडित कुटुंबातील शेख इसा शेख कासम यांना ₹5000 ची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. तसेच आगामी रमजानसाठी संपूर्ण रमजान किट व अन्य आवश्यक साहित्य पुरवण्याचे आश्वासन बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी दिले.
या मदतकार्यावेळी जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, सहसचिव अब्दुल रऊफ टेलर, सिकालगर बिरादरीचे मुजाहिद खान, ॲड. आवेश शेख, उस्मानियाचे समीर शेख तसेच पीडित कुटुंबातील सदस्य मामा आरिफ शेख व बंधू इम्रान शेख उपस्थित होते.