डॉ. श्रद्धा पाटील यांना ‘युवा अमंग गायनॅकोलॉजिस्ट’ पुरस्काराने सन्मान. -प्रसूतीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी राज्यस्तरीय गौरव

24 प्राईम न्यूज 23 Feb 2025.
जळगाव: चंद्रपूर येथे आयोजित अखिल महाराष्ट्र प्रसूतीशास्त्र व स्त्रीरोग तज्ज्ञ असोसिएशनच्या राज्यस्तरीय कॉन्फरन्समध्ये जळगावच्या प्रख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा पाटील यांना ‘युवा अमंग गायनॅकोलॉजिस्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कॉन्फरन्समध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतील ४१ तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ पाच तज्ज्ञांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला, आणि डॉ. श्रद्धा पाटील या त्या मानकरींपैकी एक ठरल्या.
विशेष म्हणजे, या पुरस्काराची यंदा पहिल्यांदाच स्थापना करण्यात आली असून, पहिल्या मानकरी होण्याचा सन्मान डॉ. पाटील यांनी मिळवला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत असोसिएशनने त्यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविले.
या सन्मानाबद्दल जळगाव प्रसूतीशास्त्र असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास भोळे, सचिव डॉ. शीतल भोसले आणि असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी डॉ. श्रद्धा पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.