अनिल भाईदास पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती

आबिद शेख/अमळनेर
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी मा. मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जळगाव, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांच्या पक्ष संघटनेच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी देण्यात आली आहे.
या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी यापूर्वीही त्यांच्यावर तीन जिल्ह्यांचे सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती, ती त्यांनी प्रभावीपणे पार पाडली होती. आता प्रभारी पद मिळाल्याने त्यांची संघटनात्मक जबाबदारी आणखी वाढली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्यासह जिल्हा व राज्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ही जबाबदारी पक्षाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.