पहिल्या जळगाव फुटबॉल चषकाचा मानकरी ठरला जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल संघ तर उपविजेता विदर्भ इलेव्हन बुलढाणा

आबिद शेख/ अमळनेर
विजय संघास २५ हजार तर उपविजेते संघास ११ हजाराचे पारितोषिक सह ट्रॉफी
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर तीन दिवसापासून सुरू असलेल्या प्रथम जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेचा अंतिम सामना विदर्भ इलेव्हन बुलढाणा विरुद्ध जळगाव फुटबॉल अकॅडमी यात झाला अत्यंत चुरशीच्या या सामन्यात खेळ संपेपर्यंत पर्यंत कोणताही संघ गोल करू शकला नाही. टाय ब्रेकरवर जळगाव फुटबॉल संघाने ४ _३ ने विदर्भ एलेवेंता पराभव केला.
तत्पूर्वी सकाळी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात
विदर्भ इलेव्हन बुलढाणा संघाने अमरावती टायटनचा ३:२ ने तर
दुसऱ्या उपांत्य फेरीत
जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमीने ईगल स्पोर्टिंग क्लब भुसावळचा २:० ने पराभव केला.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू
*बेस्ट गोलकीपर :- जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमी चा उत्कर्ष देशमुख
*बेस्ट डिफेंडर : ईगल स्पोर्टिंग भुसावळ चा बॉबी सिंगाटे
*बेस्ट स्टायरकर :- ब्रुनो विदर्भ इलेव्हन बुलढाणा
विजेता उपविजेता संघात रोख पारितोषिक सह ट्रॉफी
विजेता संघ जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमी यास रोख २५ हजार व उपविजेता संघ विदर्भ इलेव्हन बुलढाणा यास रोख ११ हजार सह जळगाव फुटबॉल चषक देण्यात आले.
* मिड फिल्डर : _ मिराज खान, जळगाव स्पोबेस्टर्ट्स
पारितोषिक वितरण यांच्या हस्ते झाले
प्रतिभाताई शिंदे लोक संघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष, पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील ,डॉक्टर मंदार पंडित, डॉक्टर मनीष चौधरी, महावीर क्लासेस चे नंदलाल गादिया, मलिक फाउंडेशनचे नदीम मलिक, सामाजिक कार्यकर्ते
अरशद शेख, रूप रंग पेंट चे फारुक बीबा, पेंट पॉईंट इम्रान मलिक, नागोरी चहाचे जमीर नागोरी, स्पोर्ट्स हाऊस चे अमीर शेख, जळगाव स्पोर्ट्स अकॅडमी चे फारुक शेख ,हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाची समारोपीय प्रस्तावना फारुख शेख यांनी सादर केली तर सूत्रसंचालन प्रा डॉ अनिता कोल्हे,हिमाली बोरोले व आभार अमृता चौधरी यांनी मानले.