महिलांसाठी मोठी बातमी! ‘लाडकी बहीण’ योजनेचा हप्ता वेळेपूर्वी खात्यात..

24 प्राईम न्यूज 22 Feb 2025
राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अपेक्षेपेक्षा लवकरच जमा होणार आहे. सामान्यतः हा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिला जातो, मात्र 3490 कोटी रुपये मंजूर झाल्याने उद्यापासूनच लाभार्थींना रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे.
दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत
महिला सशक्तीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. त्यासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेली ही योजना महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे.
काही महिलांना मिळणार नाही हप्ता!
महिला व बालविकास विभागाने अपात्र लाभार्थ्यांची तपासणी सुरू केली असून, काही महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे.
➡️ नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त 500 रुपये मिळतील.
➡️ दिव्यांग विभागाच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना वगळण्यात आले आहे.
➡️ चारचाकी वाहन असलेल्या 2.5 लाख महिलांना लाभ नाकारण्यात आला आहे.
➡️ अपात्र ठरलेल्या महिलांनी स्वतःहून अनुदानाचे पैसे परत करायला सुरुवात केली आहे.
योजनेतील पात्र महिलांची अंतिम संख्याही लवकरच जाहीर केली जाणार आहे.