जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेचा अंतिम सामना आज – विजेत्या संघाची होणार घोषणा!

आबिद शेख/अमळनेर
जळगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आयोजित पहिल्या जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी ईगल भुसावळ, जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमी, विदर्भ इलेव्हन बुलढाणा आणि अमरावती टायटन हे संघ पोहोचले आहेत. आज (शनिवार) होणाऱ्या उपांत्य फेरीतील विजयी संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत.
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे हा थरारक सामना होणार असून, जळगावकरांनी सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत मैदानात उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे फारुक शेख यांनी केले आहे.
उपांत्य फेरीतील सामने:
📌 सकाळी ९:०० वाजता: विदर्भ इलेव्हन बुलढाणा 🆚 अमरावती टायटन
📌 सकाळी ११:०० वाजता: ईगल स्पोर्टिंग क्लब भुसावळ 🆚 जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमी
✅ अंतिम सामना: दुपारी ३:०० वाजता
स्पर्धेच्या प्रमुख अतिथींची उपस्थिती
स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीच्या उद्घाटनावेळी पोलीस उपनिरीक्षक भास्कर पाटील, मलिक फाउंडेशनचे प्रमुख तथा राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष नदीम मलिक, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रो. डॉ. अनिता कोल्हे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार पंडित आणि राष्ट्रीय खेळाडू अरबाज खान यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली.
उप उपांत्य फेरी निकाल:
✔ धुळे विजय 🆚 अमरावती गॅलेक्सी (२-०)
✔ ईगल भुसावळ विजय 🆚 महाराष्ट्र युनायटेड बुलढाणा (१-०)
✔ विदर्भ इलेव्हन बुलढाणा विजयी 🆚 धुळे (१-०)
✔ अमरावती टायटन विजय 🆚 उस्मान युनायटेड भुसावळ (पेनल्टी – ५-४)
आज होणाऱ्या अंतिम सामन्यात कोणता संघ पहिल्या जळगाव फुटबॉल चषकाचा मानकरी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे!