पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्याचा निषेधा सह आरोपींवर कारवाईची मागणी – एकता संघटन

आबिद शेख/अमळनेर
जळगाव जिल्हा पोलीस दलावर उमरटी व पाळधी येथील गुंडांनी हल्ला करून मनोबल खचवण्याचा प्रयत्न केला त्याचा तीव्र शब्दात निषेध करत असून अशा या गुन्हेगारांवर अत्यंत कठोर कारवाई करावी अशी मागणी एकता संघटन जळगाव ने पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन एका निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनात सहा घटनांचा उल्लेख
३१डिसेंबर रोजी पाळधी येथील २३ दुकान जाळल्या प्रकरणी फरार आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
पिंपळगाव हरेश्वर येथे एका सानिया बि हिस एका गुंडाने पळवून नेले आहे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही
निंभोरा पोलीस स्टेशन अंतर्गत बलवाडी येथील मौलाना इरफान खान रसूल खान यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातील आरोपी पवन खराटे याला सुद्धा अद्याप अटक झालेली नाही.
शिरसोली येथे गोमास विक्रीच्या संशयावरून युसुफ शेख यांना नग्न करून धिंड काढून मारहाण करण्यात आली त्याची तक्रार अद्याप नोंदवण्यात आली नाही.
तिच्या पत्नीची तक्रार फक्त एन सी म्हणून नोंदवण्यात आली वास्तविक तिला मारहाण सह विनय भंग झालेला असताना ती तक्रार नोंद झाली नाही.
सदर प्रकरणी सर्व आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप नखाते यांचे आश्वासन
एकता शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली असता सदर पाचही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून सुद्धा आरोपींवर कडक कारवाई न झाल्याने किंवा अटक न झाल्याने त्यांचे मनोबल उंचावत आहे व ते गंभीर गुन्हे करत असल्याने वेळीच त्याच्यावर आवश्यक ती कारवाई न झाल्यास जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती गंभीर स्वरूप घेईल अशी तक्रार एकता संघटनेचे फारुक शेख यांनी केली असता वरील सर्व घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिले.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
फारुक शेख, नदीम मलिक, अन्वर खान, मतीन पटेल, अनिस शहा, मजहर पठाण, सय्यद इरफान, कासिम उमर, इमरान शेख, नाजमोद्दीन शेख ,सईद फयाज , रेहान पिंजारी, आदींची उपस्थिती होती.
फोटो
पोलीस अधीक्षक कार्यालयात वार्ताहर यांचेशी वार्तालाप करताना एकता शिष्टमंडळ चे पदाधिकारी