मदरसा अब्बासिया बाहेरपुरा चा तिसरा वार्षिक जलसा यशस्वीपणे पार पडला..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर, 23 फेब्रुवारी 2025 – मदरसा अब्बासिया बाहेरपुरा चा तिसरा वार्षिक अत्यंत यशस्वी झाला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी कुरआन पठण, नात, बयान आणि विविध धार्मिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.
अब्बासिया मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष, सचिव व सर्व ट्रस्टी तसेच मदरशाच्या इमाम साहेब, मुदर्रिस आणि मोअल्लिम हजरत यांनी जलशात उपस्थित राहिलेल्या सर्व पाहुण्यांचे व पालकांचे मनःपूर्वक आभार मानले, ज्यांनी आपला मौल्यवान वेळ देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
हा जलसा ज्ञान व सद्गुणांचे मूल्य शिकवणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यात स्पष्टपणे दिसून आले.