परखड आणि निडर पत्रकारितेचा सन्मान – इम्रान शेख यांना ॲप्रेसिएशन सन्मान पत्र प्रदान..

24 प्राईम न्यूज 24 Feb 2025
लोक सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित ‘उत्कृष्ट विविध पुरस्कार वितरण सोहळा – वर्ष ३’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सय्यद करीम सालार होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापक आणि शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रांतील ३३ मान्यवरांना शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता, आरोग्य आणि उत्कृष्ट प्रतिनिधित्व आदी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
याच सोहळ्यात संस्थापक अध्यक्ष अब्दुल हाफिज अब्दुल हक्क साहेबांनी परखड आणि निडर पत्रकारितेची दखल घेत पत्रकार इम्रान शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ॲप्रेसिएशन सन्मान पत्र व सन्मान चिन्ह प्रदान केले. हा गौरव उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण महर्षी म्हणून सुप्रसिद्ध अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांचे कौतुक करत लोकसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या कार्याचेही भरभरून स्तुती केली.