जळगाव लाचलुचपत विभागाची यशस्वी कारवाई – तलाठी 6000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडला..

24 प्राईम न्यूज 28 Feb 2025.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जळगाव युनिटने पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे (वय 50) याला 6000 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
प्रकरण असे आहे:
तक्रारदार व त्यांच्या भावाच्या शेतातील 9 प्लॉट्सवरील नोंदी लावून देण्यासाठी तलाठी महेशकुमार सोनावणे यांनी 10,170 रुपयांची लाचेची मागणी केली होती. दर नोंदीसाठी 1130 रुपये याप्रमाणे ही मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ही रक्कम 6000 रुपयांवर आली, आणि ती स्वीकारताना तलाठी सोनावणे यांना एसीबीच्या पथकाने पकडले.
एसीबीची तडाखेबंद कारवाई:
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे सापळा रचून 27 फेब्रुवारी 2025 रोजी तलाठी सोनावणे यांना 6000 रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष अटक केली. त्यांच्याविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पथक:
▪️ मार्गदर्शन: मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि., नाशिक परीक्षेत्र)
▪️ पर्यवेक्षण अधिकारी: श्री योगेश ठाकूर (पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. जळगाव)
▪️ सापळा अधिकारी: श्रीमती स्मिता नवघरे (पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. जळगाव)
▪️ सापळा पथक: पो. हे. कॉ. किशोर महाजन, पोकॉ. राकेश दुसाणे, पोकॉ. पोळ
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना:
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क साधावा.
📞 दूरध्वनी क्रमांक: 0257-2235477
📞 टोल फ्री क्रमांक: 1064