मार्च महिन्यात १४ दिवस बँका बंद: महत्त्वाच्या कामांचे आधीच नियोजन करा…

24 प्राईम न्यूज 27 Feb 2025
मार्च महिन्यात देशभरातील विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये ५ रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवारी असलेल्या नियमित सुट्ट्यांव्यतिरिक्त १४ मार्चला होळी आणि ३१ मार्चला ईद-उल-फितर या सणांच्या दिवशीही बँका बंद असतील.
याशिवाय, मार्चमध्ये १२ दिवस शेअर बाजारही बंद राहणार आहे. त्यामुळे बँक किंवा शेअर बाजाराशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास, या सुट्टींचा विचार करून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
तथापि, ऑनलाइन बँकिंग, एटीएम सेवा आणि डिजिटल व्यवहार या सुट्ट्यांदरम्यानही सुरू राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येईल.