अमळनेर शहरातील बंद पथदिव्यांची तक्रार मोबाईलद्वारे नोंदवा..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर नगरपरिषदने शहरातील नागरिकांसाठी एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार, बंद असलेल्या पथदिव्यांच्या (Street Light) तक्रारी आता मोबाईलद्वारे नोंदवता येणार आहेत.
तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक:
📞 9226404011
तक्रार नोंदविण्याची वेळ व पद्धत:
✅ कार्यालयीन वेळेत (सकाळी ९.३० ते सायं ६.३० पर्यंत)
थेट कॉल करून तक्रार नोंदवू शकता (सुट्टीचे दिवस वगळून).
✅ कार्यालयीन वेळेपेक्षा बाहेरील वेळेत
WhatsApp किंवा SMS द्वारे तक्रार नोंदवू शकता.
नगरपरिषदेच्या या उपक्रमामुळे बंद पथदिव्यांची माहिती प्रशासनापर्यंत तातडीने पोहोचेल आणि वेळेत दुरुस्ती होण्यास मदत होईल. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.