जळगावच्या अलफैज उर्दू शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार आणि मुख्याध्यापक आसिफ पठाण यांच्याविरुद्ध विनयभंग, अश्लील कृत्ये तसेच फौजदारी स्वरूपाच्या धमकीचा गुन्हा दाखल..

0

24 प्राईम न्यूज 28 Feb 2025.

जळगाव शहरात सालार कुटुंबीयांची अलफैज एज्युकेशन ट्रस्ट मार्फत उर्दू शाळा व अब्दुल करीम सालार इंग्लिश मीडियम स्कूल शिवाजीनगर येथील गेंदालाल मिल परिसरात चालवली जात असून या येथील एका शिक्षिकेने चेअरमन मुश्ताक अहमद इकबाल अहमद सालार व मुख्याध्यापक आसिफ पठाण यांच्या विरोधात विनयभंग त्यासह विनयभंग करण्याच्या उद्देशाने बल प्रयोग करणे, अश्लील कृती करणे, फौजदारी पात्र धाकदपटशा दाखवणे अशा भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५),७४,२९६,३५१(२),३५२ नुसार एफ आय आर क्रमांक ६८/२५ दिनांक २६/२/२५ रोजी जळगाव शहर पोलीस स्टेशन जळगाव येथे रात्री १०.३० वाजता गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास प्रदीप पाटील हे करीत आहे.
या गुन्ह्यामुळे जळगाव शहरातील नामांकित सालार कुटुंबीयांच्या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

फिर्यादीत काय आहे नमूद?

डॉक्टर अब्दुल करीम सालार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये एक शिक्षिका दीड वर्षापासून कार्यरत असून तिला शिक्षण क्षेत्रातील अकरा वर्षाचा अनुभव आहे . सदर शाळा ही उर्दू शाळेच्या इमारतीमध्येच सुरू आहे. जरी डॉक्टर करीम सालार शाळेची मुख्याध्यापिका महिला असली तरी सदर शाळेचा संपूर्ण कार्यभार उर्दू शाळेचे मुख्याध्यापक आसिफ पठाण हेच बघत असतात.
सदर शाळेत मुख्याध्यापक आसिफ पठाण यांचे एका दुसऱ्या शिक्षिकेसोबत प्रेम संबंध सुरू असून त्याचा परिणाम इतर शिक्षक वृंद व शाळेतील मुलं आणि मुलीवर होत असल्याने सदर बाब फिर्यादी शिक्षिकेने शाळेचे चेअरमन मुशताक सालार , अध्यक्ष अजिज सालार व संस्थापक करीम सालार यांना सांगितली असता मुख्याध्यापक आसिफ पठाण याला तिचा राग आला व त्याने त्या फिर्यादी महिलेचा शाळेतीलच शौचालयात विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर बलप्रयोग करून तिच्या गालाला हात लावून , अश्लील कृती करून फौजदारी पात्र धाकपटशा दाखवल्या एवढे नव्हे तर फिर्यादी शिक्षिका शाळेतून बाहेर जाताना रस्त्यावर सुद्धा तिची छेड काढली व धमकी दिली.

सदर बाब चेअरमन मुश्ताक सालार यांना सांगितले असता त्यांनी सदर फिर्यादी शिक्षकेला भर शाळेतून अश्लील शिवीगाळ करून तिचे हात पकडून शाळेच्या गेट बाहेर काढले म्हणून फिर्यादीने सदर बाब संस्थेचे संस्थापक करीम सालार , अजिज सालार (बिट्टू अंकल) यांना सांगितले असता त्यांनी आम्ही तुम्हाला न्याय देऊ आपण थोड थांबा असे सांगून वेळ मारून नेली.

पोलीस अधीक्षकांची भेट
सदर फिर्यादी शिक्षिका ही मानसिक दडपणाखाली असल्याने मॅनेजमेंट तर्फे न्याय मिळत नसल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्याप्रमाणे शहर पोलीस स्टेशन जळगावचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी फिर्यादी शिक्षकेला धीर देऊन तिची तक्रार नोंदवून घेतली.

फिर्यादी प्रमाणे २ आरोपी
फिर्यादी शिक्षिके च्या तक्रारी नुसार मुख्याध्यापक असिफ पठाण यांनी ज्याप्रमाणे विनयभंग करून दादागिरी केली तसेच शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार यांनी संबंधित फिर्यादी शिक्षकेचे हात पकडून अश्लील शिवीगाळ करून शाळेच्या बाहेर काढले म्हणून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे.

दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा

उपरोक्त गुन्ह्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४ हा दखलपात्र व अजामीन पात्र गुन्हा असून कलम २९६, ३५१, ३५२ हे सुद्धा दखलपात्र गुन्हे असून यात १ ते ५ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

अल्पसंख्यांक शाळेतील अश्लील कृती उजेडात

अलफैज फाउंडेशनच्या या शाळेत उर्दू व इंग्रजी माध्यमाची १ली ते १२ वी चे वर्ग शिकवले जातात त्या ठिकाणी तरुण मुलं-मुली सुद्धा शिक्षण घेत असल्याने मुख्याध्यापक व शिक्षिका प्रेम करून अश्लील कृत्य करत असेल व त्यास दुसरी शिक्षिका आळा घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर शाळेच्या व्यवस्थापनाने प्रेम प्रकरण लपवण्यासाठी फिर्यादी शिक्षिकेचाच विनयभंग, अश्लील कृती करून फौजदारी पात्र धाकदपट दाखवून तिच्या सोबत अन्याय केला यामुळे अल्पसंख्यांक शिक्षण क्षेत्रात हा हा कार माचलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!