उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप संपन्न

24 प्राईम न्यूज 28 Feb 2025
एरंडोल, 27 फेब्रुवारी 2025 – उर्दू शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. या दोन टप्प्यांच्या प्रशिक्षणामध्ये मोहम्मद जाकीर मोहम्मद इस्माईल, मोहम्मद हसन सर आणि मोहसीन खान सर यांनी सुलभक (संचालक) म्हणून मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान नवीन उपक्रम राबवण्यात आला, ज्यामध्ये उत्कृष्ट सहभाग आणि वेळेचे पालन करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना सन्मानित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात शेख बिलाल रफीउद्दीन यांना, तर दुसऱ्या टप्प्यात शाहीन बी शेख अजीज यांना उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून पुरस्कार देण्यात आला.
समारोप सोहळ्यास एरंडोल उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख अलाउद्दीन सर, बीआरसीचे विषयतज्ञ योगेश कुबडे सर तसेच तिन्ही तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणा दिली आणि शिक्षक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले.