हेमंत भांडारकर यांची ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या राज्य कार्यकारिणीवर नियुक्ती

आबिद शेख/अमळनेर
ग्राहक हक्क आणि कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ग्राहक कल्याण फाऊंडेशन संघटनेच्या राज्य कार्यकारिणीवर हेमंत भांडारकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
हेमंत भांडारकर हे ग्राहक हक्क संरक्षण आणि जनजागृतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ ग्राहक कल्याण फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांना मिळणार आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा!