जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणीला गती!

जळगांव/प्रतिनिधी
100 दिवसांत 100% नळजोडणीचे उद्दिष्ट – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणीला वेग देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधत वीज जोडणीतील अडथळे दूर करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
महत्त्वाचे निर्णय:
✅ 462 पाणीपुरवठा योजना अद्याप अपूर्ण, त्यापैकी 281 योजनांचे अंदाजपत्रक तातडीने सादर करण्याचे निर्देश
✅ 100 दिवसांत 100% नळजोडणी अभियान राबविण्याचा निर्णय
✅ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यास गती, 20 मार्चपर्यंत नेट मीटरिंग प्रक्रियेचे नियोजन
✅ तालुकानिहाय ट्रान्सफार्मर आणि वीज जोडणी कामांना मंजुरी
बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महावितरण व पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना अखंडित वीज आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळणार!