ईलाही अरबी मदरशाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर शहरातील बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टच्या वतीने ईलाही अरबी मदरशाचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच सुरत येथील हाफिस आवेश रजा यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावर्षी ईलाही अरबी मदरशातून दहा विद्यार्थ्यांनी पवित्र कुराण पूर्ण केले असून त्यामध्ये पाच मुले व पाच मुली आहेत. तसेच, चाळीस विद्यार्थ्यांनी विविध धार्मिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. या सर्वांना मदरशाचे प्रमुख मौलाना हाजी नासिर बागवान यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमात ट्रस्टच्या माध्यमातून हाफिज आवेश रजा, नासिर मौलाना, हाफिज अल्कमश सगीर नुरी, शाकिर रंगरेंज, अब्दुल हमीद शेख, करीम खा पठाण आणि रशिद पेंटर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कुराण शरीफ, जानमाज तसेच विविध प्रकारची बक्षिसे प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बारा भाई उर्फ अंदरपुरा मोहल्ला ट्रस्टचे अध्यक्ष अफसर खान पठाण, उपाध्यक्ष आरीफ मेमन, सेक्रेटरी जमीलोदीन शेख, सदस्य अशफाक शेख, रियाज ठेकेदार, अहेतेशाम खान, मुजाहिद शेख यांनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन कारी मोतेशिम मौलाना यांनी केले.