पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे भव्य विज्ञान प्रदर्शनाचा उत्साह..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर : वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित पर्ल इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते झाले.
विद्यार्थ्यांनी विविध शास्त्रीय प्रयोग आणि प्रकल्प सादर करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. Salt Water Experiment (पाणी + मिठ प्रयोग), Sugar Water Rainbow Experiment (साखर + पाणी इंद्रधनुष्य प्रयोग), Day-Night Model (दिवस-रात्र वर्किंग प्रयोग), Water Purification Model (पाणी शुद्धीकरण प्रयोग) अशा अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगांनी विज्ञानप्रेमींना आकर्षित केले.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी पालक आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रज्ञा पाटील मॅडम, कुंजल पाटील मॅडम, मयुरी चौधरी मॅडम, उष्कर्षा लोकंक्षी मॅडम, विजय चौधरी तसेच ITI चे प्राचार्य प्रकाश पाटील सर, प्रमोद पाटील सर, समाधान शिरसाठ सर, सखाराम पावरा, उमेश पाटील, राजेंद्र पाटील यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी आणि प्रयोगशीलतेला चालना देण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.