डंपर चालकावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अपघात केला हा गुन्हा दाखल करा. -महाविद्यालयाने त्वरित विद्यार्थी बस व एसटीचा थांबा द्यावा. संतप्त विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

24 प्राईम न्यूज 2 Mar 2025

१ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जळगाव ममुराबाद रोडवरील अरुना माई कॉलेज ऑफ फार्मसी ममुराबाद येथील तृतीय वर्षात शिक्षण घेणारा व जळगाव येथील रजा कॉलनी मधील राहणारा युवक पटेल फैसल मुस्ताक याचा डंपर क्रमांक एम एच १३ ए एन ४४४५ याने अत्यंत जोरात येऊन मोटरसायकलचा अपघात घडवून आणला व त्यात फैसल पटेलचा त्याच ठिकाणी जीव गेला तर त्याचा मित्र वासिफ खान युसुफ खान हा गंभीर जखमी असून खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे.
सर्व कॉलेजचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते रुग्णालयात
संतप्त विद्यार्थ्यांनी जळगावच्या सामाजिक कार्यकर्ते यांना महाविद्यालयातील उणिवा तसेच अपघात झाल्यानंतर महाविद्यालय व प्रशासनातर्फे झालेला निष्काळजी कॉलेजचे प्राचार्य देशमुख व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार विलास शिंदे यांच्यासमोर रागाने व्यक्त केला.
पोलीस प्रशासन व कॉलेज ला तक्रार अर्ज सादर
विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना व त्या ठिकाणी जळगाव शहरातील उपस्थित सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे पोलीस अधीक्षक जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव व तालुका पोलीस स्टेशन जळगाव व महाविद्यालयास तक्रार अर्ज एकता संघटनेचे फारुक शेख यांनी सादर केला व त्यात मागणी केली की
१) सदर मार्गावर डंपर हे खडी, रेती, विटा, घेऊन अत्यंत वेगाने जातात त्यामुळे वारंवार अपघात होत आहे म्हणून प्रशासनाने त्वरित आवश्यक ती उपाययोजना करावी.
२) डंपर चालकावर अत्यंत बेजबाबदार पणे वाहन चालवून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने पटेल यास ठार केले याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात यावा.
३) महाविद्यालयाने विद्यार्थिनी साठी ज्याप्रमाणे बस सेवा सुरू केली आहे त्याच धरतीवर मुलांसाठी सुद्धा त्वरित बस सेवा सुरू करावी
४) अपघात झाल्यावर फैसल पटेल ला महाविद्यालयाने एक ते सव्वा तास पर्यंत कोणत्याही स्वरूपाची ट्रान्सपोर्ट सेवा उपलब्ध करू न दिल्यामुळे या निष्काळजीपणामुळे त्याचा जीव गेला असावा म्हणून भविष्यात अपघात घडतात जखमिला आवश्यक ती वाहन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
५) महाविद्यालयासाठी राज्य परिवहन महामंडळाशी संपर्क साधून त्या ठिकाणी अधिकृत थांबा देण्यात यावा.
अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.