रेल्वेच्या तिकीट बुकिंग नियमांत मोठा बदल! आजपासून नवीन प्रणाली लागू..

आबिद शेख/अमळनेर -रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल केले असून, आजपासून (1 मार्च 2025) हे नवे नियम लागू झाले आहेत. प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
नवीन नियम आणि महत्त्वाचे बदल:
✔️ आरक्षण कालावधी: 120 दिवसांऐवजी आता फक्त 60 दिवस आधी तिकीट बुक करता येणार.
✔️ वेटिंग तिकीट नियम: वेटिंग तिकीटधारकांना केवळ जनरल डब्यातच प्रवेश मिळणार, रिझर्व्ह डब्यात परवानगी नाही. नियम मोडल्यास दंड आकारला जाईल.
✔️ तात्काळ (Tatkal) तिकीट वेळ:
- AC क्लाससाठी: सकाळी 10 वाजता
- Non-AC क्लाससाठी: सकाळी 11 वाजता
✔️ रिफंड पॉलिसी: ट्रेन रद्द झाल्यास किंवा 3 तासांहून जास्त उशीर झाल्यास पूर्ण रिफंड मिळणार.
✔️ AI तंत्रज्ञानाचा वापर: सीट वाटप अधिक प्रभावी करण्यासाठी AI आधारित प्रणाली लागू केली जाणार.
✔️ परदेशी पर्यटकांसाठी विशेष सुविधा: आता 365 दिवस आधी तिकीट बुकिंगची परवानगी.
हे नवे नियम लागू झाल्याने प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचा योग्य नियोजन करता येणार आहे. तसेच, नो-शो समस्या आणि वेटिंग लिस्टचा गोंधळ कमी करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.