पवित्र रमजानची सुरुवात. -5 वर्षीय चिमुकल्याचा पहिला रोजा..

आबिद शेख/अमळनेर
दि. 2 मार्चपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, या पवित्र महिन्याच्या प्रारंभीच कसाली मोहल्ल्यातील मोहम्मद मिरान खा अफजल खा पठाण (वय 5) आणि माहिरा खान आबिद खान (वय 5) यांनी पहिला रोजा ठेवत अनुकरणीय उदाहरण घालून दिले.
विशेष म्हणजे, तब्बल 16 तास कोणतेही अन्न-पाणी न घेत या चिमुकल्यांनी हा कठीण उपवास पूर्ण केला. त्यांच्या आत्मशिस्तीचे आणि श्रद्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या छोट्यांच्या धैर्याने संपूर्ण कुटुंब आणि समाज भारावून गेला असून, त्यांचा नातेवाईकांकडून प्रशंसा करण्यात येतं आहे
रमजानच्या या शुभ काळात अशा निष्पाप आणि भक्तिमय समर्पणाचे उदाहरण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.