अमळनेरमध्ये वेश्या वस्तीसंदर्भात न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना; ७ मार्चला आक्रोश मोर्चा..

0

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतरही अमळनेर शहरातील गाधलीपुरा, पारधी वाडा व बौद्ध वाडा भागात देह व्यापार सुरूच असल्याचा आरोप करत ७ मार्च रोजी शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी नाही
९ ऑक्टोबर २०२४ रोजी न्यायालयाने जिल्हा दंडाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी, नगरपालिका यांना त्वरित कारवाईचे निर्देश दिले होते. पीटा कायद्याच्या कलम १७ व १८ अंतर्गत कारवाई करावी, असेही आदेश होते. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप आहे.

अवमान याचिकेचा इशारा
न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नसल्याने अमळनेर येथील शिष्टमंडळाने जळगाव जिल्हा एकता संघटनेचे समन्वयक फारुक शेख यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजेंद्र पाटोळे यांची भेट घेतली. त्यांनी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

रमजानमध्ये आक्रोश मोर्चा
देह व्यापार सुरू असलेल्या भागात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. पवित्र रमजान महिन्यात या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचिकाकर्त्यांना त्रास देण्यासाठी काही दलाल खोट्या केसेस दाखल करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे ७ मार्च रोजी सर्वधर्मीय, सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मोर्चाचे समन्वयक मौलाना रियाजोद्दीन यांनी दिली.

शिष्टमंडळात यांचा समावेश
या शिष्टमंडळात एकता संघटनेचे फारुक शेख व अनिस शहा, अमळनेर येथील रियाजुद्दीन शेख, कुदरत अली मोहम्मद अली, शेरखान मोहम्मद खान, कमर अली शहा, माझरोद्दीन अलाउद्दीन शेख, अब्दुल गफार खाटीक, हैदर मिस्तरी, शाहरुख शेख अनवर, सय्यद मोईन अली, आसिफ अली सय्यद, अदनांत शेख आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!