टाकरखेडे येथे लाल बावटा शेतमजूर युनियन शाखेची स्थापना…

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर ता. टाकरखेडे येथे लाल बावटा शेतमजूर युनियन शाखेची स्थापना करण्यात आली. दि. 3 मार्च रोजी आयोजित शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या सभेत ही शाखा स्थापन करण्यात आली.
ही सभा कॉम्रेड ज्ञानेश्वर पाटील (भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा सचिव), कॉम्रेड गोरख वानखेडे (जिल्हा सहसचिव, शेतमजूर युनियन) यांच्या मार्गदर्शनाखाली व कॉम्रेड मिराबाई सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेत मनरेगा अंतर्गत रोजगार हमी, मजुरांचे जॉब कार्ड, गावपातळीवरील रोजगार उपलब्धता, आरोग्य सुविधा, तसेच शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता.
आपले हक्क मिळवण्यासाठी शेतमजूर व कष्टकऱ्यांनी संघटित होण्याचा निर्धार व्यक्त केला आणि लाल बावटा शेतमजूर युनियन ची स्थापना करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली:
अध्यक्ष: सौ. सोनी विनोद मोरे
सचिव: श्रीमती प्रवीण हुसेन पिंजारी
उपाध्यक्ष: सौ. आशाबाई रविंद्र पाटील
सहसचिव: सौ. मिराबाई आनंदा सोनवणे
खजिनदार: सौ. गुड्डी कमलेश खंडाळे
नवनिर्वाचित अध्यक्ष सौ. सोनी मोरे यांनी मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले.
या सभेला गावातील अनेक शेतमजूर, महिला आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.