जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाची मोठी कामगिरी – कार्यालयीन सुधारणा मोहिमेत राज्यात द्वितीय क्रमांक..

24 प्राईम न्यूज 1 Mar 2025
राज्यातील प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या “कार्यालयीन सुधारणा” विशेष मोहिमेत जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने उल्लेखनीय यश मिळवले आहे. अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विशेष अभिनंदन पत्र देऊन मुंबईत सन्मानित केले. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होत्या.
या यशामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रशासनाच्या कार्यक्षमतेला मोठी दाद मिळाली असून, पारदर्शक आणि गतिमान सेवेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे.