*जागतिक महिला दिनी होणार धडपडणाऱ्या महिलांचा सन्मान..**भव्य कीर्तन सोहळ्याचेही आयोजन : स्वप्ना पाटील व विक्रांत पाटील यांचा स्तुत्य उपक्रम..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘प्रभाग क्र. १७ अ’च्या भावी नगरसेविका स्वप्ना विक्रांत पाटील व माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ व समाज प्रबोधनासाठी भव्य किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी (८ मार्च) रात्री ८ ते ११ या वेळेत श्री. संत सखाराम महाराज यांच्या शेतातील शारदा कॉलनी व सावता बाडी मधील मोकळ्या मैदानावर, श्रीकृष्ण नगर, वड चौक, अमळनेर येथे हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यात समाजातील महिलांचा गौरव करण्यात येणार असून सुप्रसिद्ध अहिराणी कीर्तनकार ह.भ.प. श्री रविकिरण महाराज (दोंडाईचाकर) यांच्या जाहीर किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व जनजागृती होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प. श्री अरुणबापू पाटील, माऊली भजनी मंडळ पैलाड, मृदुंगाचार्य ह.भ.प. श्री निवृत्ती महाराज कानळदेकर, गायनाचार्य ह.भ.प. श्री गजानन महाराज भोलाणेकर, हार्मोनियम वादक ह.भ.प. श्री चतुर महाराज लोंढवेकर तसेच सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश अर्जुन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.