शहआलमनगर येथील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका – प्रशासन डोळेझाक करतंय?

आबिद शेख/अमळनेर
शहआलम नगर येथील मुख्य रस्त्यावर व्हालचा मोठा खडा असून, यामुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, शाळेत ये जा करतात, त्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले असून, मोठ्या अपघाताची वाट पाहिली जात आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.