जागतिक महिला दिनानिमित्त शहापूर येथे महिला सन्मान सोहळा व मेळावा आयोजित..

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या गौरवाचा भव्य सोहळा आणि महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मा. सौ. सुषमाताई वासुदेव पाटील (विभागीय अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र सरपंच परिषद) उपस्थित राहणार असून, मा. श्रीमती स्मिताताई उदय वाघ (खासदार, जळगांव लोकसभा), मा. सौ. विमलबाई रमेश पाटील (नगरसेविका, नाशिक), मा. डॉ. निलिमाताई देशपांडे (वैद्यकीय अधिकारी, चोपडा), मा. सौ. वसुंधराताई लांडगे (संचालिका, खा. शि. मंडळ, अमळनेर) यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत, शहापूर यांच्या वतीने करण्यात आले असून, गौरेश्वर महादेव मंदिर, शहापूर येथे हा सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमाची वेळ:
शनिवार, ८ मार्च २०२५
दुपारी ४ वाजता
या सोहळ्यात सहभागी होऊन महिलांच्या सन्मानाचा भाग होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.