राज्य मराठी पत्रकार परिषदे ची महत्वपूर्ण बैठक संपन्न राज्य उपाध्यक्ष पदी मोहन हिवाळे तर जिल्हाध्यक्षपदी नितेश मानकर जिल्हा सचीवपदी अनिल मुंडे…

खामगाव (शरीफ शेख ) राज्य मराठी पत्रकार परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक काल दिनांक 8 फेब्रुवारी रोजी काळेगाव येथे संपन्न झाली. या दरम्यान राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या काही नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्यामध्ये राज्य उपाध्यक्ष पदी मोहन हिवाळे तर जिल्हाध्यक्षपदी नितेश मानकर जिल्हा सचीवपदी अनिल मुंडे यांची नियुक्ती खामगाव तालुका अध्यक्ष पदी अनंतसिंग बोराडे, तर सचिव पुरुषोत्तम घोडके, बैठकीचे अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे हे होते तर खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर आप्पा भोसले संभाजी टाले गुरुबाबा पोपली यांची प्रमुख उपस्थिती होती .
या वेळी कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष पदी मलकापूर आजतक चे जिल्हा प्रतिनिधी व प्रखर खामगाव चे संपादक मोहन हिवाळे तर जिल्हाध्यक्ष म्हणून नितेश मानकर यांची केंद्रीय अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी नियुक्ती केली तसेच नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बुलढाणा जिल्हा सचिव अनिल मुंडे ,खामगाव तालुका अध्यक्षपदी अनंतसिंह बोराडे, तालुका सचिव पुरुषोत्तम घोडके, तर नांदुरा तालुकाध्यक्षपदी दिलीप इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली .संघटनेच्या मजबुतीसाठी तसेच पत्रकारांच्या एकजुटीसाठी तसेच पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी पोहोचण्याचे कार्य संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे व जिल्ह्यातील नूतन कार्यकारणी ला शुभेच्या देण्यात आल्या.