नाशिक विभागीय मिनी १४ वर्षाआतील व्हॉलीबॉल स्पर्धे साठी जळगाव चा संघ घोषित…

जळगांव (प्रतिनिधि) नाशिक विभागीय मिनी १४ वर्षाआतील व्हॉलीबॉल स्पर्धे
करिता निवड चाचणी नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे घेण्यात आली. निवड झालेले खेळाडू नाशिक येथे स्पर्धा व निवड चाचणी साठी ११ फेब्रुवारी रोजी रवाना होणार आहे.
निवड चाचणी साठी ३७ खेळाडूंचा सहभाग होता .
या निवड चाचणीला हर्षद भोसले ,धनंजय आटोळे, हर्षद भोसले, यश जंजाळे यांनी कामकाज पाहिले तसेच निवड निरीक्षक म्हणून अंजली पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच आंतरराष्ट्रीय पंच व दर्शन आटोळे राज्यस्तरीय पंच यांनी मुलांचा संघ निवडला या वेळी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष फारुख शेख व भाऊसाहेब पाटील उपस्थित होते त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले
निवड झालेले खेळाडू
1)निल सुधाकर सूर्यवंशी
2) मानव नरेंद्र ठाकूर 3)सोहम आनंद बिराडे 4)आरहाणअसीम मंसूरी
5)गंधर्व जगदीश पाटील
6)यश सतीश सैंदाणे
7) ऋषिकेश युवराज माळी
8) खुशाल विनोद सोनवणे
9) सय्यद अकिब अली
फोटो
निवड झालेले व सहभागी खेळाडू सोबत खुर्चीवर बसलेले अंजली पाटील,फारूक शेख ,संजय आटोळे तर उभे असलेले भाऊ साहेब पाटील आदी दिसत आहे