अमळनेरच्या चिमुकलीचा कौतुकास्पद उपवास – केवळ 3.5 वर्षांच्या रीजा शेख ने पूर्ण केला रोजा!

आबिद शेख/अमळनेर -अमळनेर धर्मनिष्ठा आणि श्रद्धेचा उत्तम नमुना म्हणून अमळनेर येथील एका चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रीजा तोसिफ शेख (वय 3.5 वर्षे) या लहानग्या मुलीने रमजान महिन्यातील रोजा पूर्ण केला, तोही पाण्याविना!
रीजा शेख हि नगरसेवक शेखा मिस्त्री यांची नात आहे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की तिच्या इच्छेनुसार तिने पूर्ण दिवसभर उपवास केला. तिच्या या कठोर संकल्पाचे आणि श्रद्धेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रमजानमध्ये लहान वयात इतक्या निष्ठेने रोजा पाळणाऱ्या रीजाच्या जिद्दीला स्थानिक नागरिक, धार्मिक मंडळी आणि समाजातील अनेक लोकांकडून शुभेच्छा व गौरव मिळत आहे.